Tuesday, August 18, 2026
Homeगडचिरोलीनक्षल्यांनी जंगलात पुरुन ठेवलेली स्फोटके आढळली; पोलिसांनी केली नष्ट...

नक्षल्यांनी जंगलात पुरुन ठेवलेली स्फोटके आढळली; पोलिसांनी केली नष्ट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नक्षली नवनवीन क्लृप्त्या वापरून  घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच आज,रविवारी १५ डिसेंबरला अहेरी तालुक्याच्या मरपल्ली पोलिस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या करंचा गावानजीकच्या जंगलात नक्षल्यांनी स्फोटके पुरुन ठेवलेली होती.एका प्लॉस्टिक ड्रममध्ये स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर जिमलगट्टाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत दसूरकर यांच्या नेतृत्वात मरपल्ली पोलिस मदत केंद्रातील पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी आज रविवारी परिसरात शोध मोहीम राबविली.शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना ड्रममध्ये स्फोटके आढळून आली.त्यात दोन किलो आयईडी स्फोटके,तीन वायर बंडल,एक बॅटरी,एक डिटोनेटर इत्यादी साहित्य होते.पोलिसांनी अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील बॉम्ब शोधक पथकास पाचारण करुन त्यांच्या मदतीने ही स्फोटके नष्ट करण्यात आली असल्याने नक्षल्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी हाणून पाडला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!