Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीनक्षलवादी झाले आक्रमक; ३० नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हा बंदची दिली हाक….

नक्षलवादी झाले आक्रमक; ३० नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हा बंदची दिली हाक….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त तोडगट्टा येथे खाणींविरोधात सुरू असलेले आंदोलन पोलिसांसोबत झालेल्या वादानंतर उधळण्यात आले.यावरून आता नक्षलवादी आक्रमक झाले आहेत.माओवादी संघटनेचा पश्चिम सबझोनल प्रवक्ता श्रीनिवास याने एक पत्रक जारी केले आहे.या पत्रकातून नक्षल्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तोडगट्टा आंदोलकांची सुटका करण्याच्या मागणी करीत ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा बंदची हाकही दिली आहे.

सूरजागड येथे दोन वर्षांपूर्वी लोहखाण उत्खननाला सुरुवात झाल्यानंतर एटापल्ली तालुक्यात आणखी सहा लोहखाणी प्रस्तावित आहेत.यास विरोध करत मागील अनेक दिवसांपासून दमकोंडवाही खाणविरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली परिसरातील नागरिकांचे तोडगट्टा येथे आंदोलन सुरू होते.२० नोव्हेंबरला आंदोलनस्थळापासून जवळच वांगेतुरी येथे पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले.या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथक परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना आंदोलक व पोलिस समोरासमोर आले.नक्षल्यांनी पत्रकातून वांगेतुरी येथील पोलीस मदत केंद्र हटविण्यासह आंदोलकांची सुटका करा; या मागणीला घेऊन ३० नोव्हेंबरला जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.तसेच ग्रामसभांनाही गावागावात या विरोधात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन केले.नक्षली प्रवक्ता श्रीनिवास याने या पत्रकात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनाही आंदोलनकर्त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत; अशी मागणी करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!