Monday, July 13, 2026
Homeनागपूरदोन दुचाकींची समोरासमोर आपसात जोरदार धडक.. - दुचाकी चालक तलाठ्याचा घटनास्थळीच मृत्यू...

दोन दुचाकींची समोरासमोर आपसात जोरदार धडक.. – दुचाकी चालक तलाठ्याचा घटनास्थळीच मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दोन दुचाकींची समोरासमोर आपसात जोरदार धडक झाल्याने यात दुचाकी चालक तलाठ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर दुसऱ्या दुचाकीवरील चौघांपैकी तिघे गंभीर व एकजण किरकोळ जखमी झाला.सदरची घटना देवलापार, ता.रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील पवनीनजीकच्या सीतापूर शिवारात काल,सोमवारी २३ सप्टेंबरच्या सायंकाळी ६:४५ वाजताच्या सुमारास घडली.
नरेश यादवसिंग उईके वय ४८ वर्षे,गंगाझरी,जिल्हा गोंदिया असे मृत तलाठ्याचे नाव असून,शुभम शंकर ताराचंद उईके वय १९ वर्षे,रोहन झामू भलावी वय २० वर्षे व मोनू रतनसिंग नागर वय २८ वर्षे अशी गंभीर जखमींची, तर शुभम शंकर उईके वय २५ वर्षे असे किरकोळ जखमीचे नाव असून,चौघेही पवनी,ता. रामटेक येथील रहिवासी आहेत.नरेश उईके हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून,ते रामटेक शहरात कुटुंबीयांसह राहायचे.त्यांच्याकडे रामटेक तालुक्यातील वडांबा,हिवराबाजार व दाहोदा या तीन तलाठी कार्यालयांचा कारभार असल्याने ते काल,सोमवारी सायंकाळी त्यांच्या एमएच-३५/एपी-१३८५ क्रमांकाच्या दुचाकीने दाहोदा येथून पवनी मार्गे रामटेकला जात होते.दुसरीकडे,चौघेही एमएच- ४०/ बीवाय-०६०७ क्रमांकाच्या दुचाकीने विरुद्ध दिशेने जात होते.
या दोन्ही दुचाकींची महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर जोरदार धडक झाली.यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नरेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर इतर चौघे जखमी झाले.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.त्यांनी चौघांवर पवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केले.त्यानंतर तिन्ही गंभीर जखमींना नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये,तर किरकोळ जखमीला देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले.शिवाय,नरेश यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवलापार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला.याप्रकरणी देवलापार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!