Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोली​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे प्राण वाचवले.या धाडसी कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील एक संभाव्य माता मृत्यू(Maternal Mortality)टळला असून संपूर्ण जिल्ह्यातून या वैद्यकीय चमूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.विशेष म्हणजे,देसाईगंज ग्रामीण रुग्णालय येथे यापूर्वी सिझेरियन शस्त्रक्रिया उपलब्ध नव्हती.मात्र,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व नियोजनाखाली डॉ.हीना यांची नियुक्ती देसाईगंज येथे करण्यात आली. त्यानंतर या रुग्णालयात दरमहा ५ ते १० सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडू लागल्या आहेत,ज्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  • ​नेमकी घटना काय?
काही दिवसांपूर्वी डॉ.हीना यांनी एका गरोदर महिलेची सिझेरियन(LSCS)शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली होती.शस्त्रक्रियेनंतरच्या अवघ्या पाचव्या दिवशी अचानक त्या महिला रुग्णाला तीव्र झटके (Convulsions)आले आणि त्यानंतर काही वेळातच तिचा श्वास व हृदयाचे ठोके थांबले.अशा अत्यंत गंभीर आणि आणीबाणीच्या प्रसंगी,तेथे कार्यरत असलेल्या परिचारिका(Staff Nurse)कविता यांनी कसलाही वेळ न गमावता रुग्णावर उपचार सुरू केले. परिचारिका कविता यांना नामांकित कार्डियाक हॉस्पिटलमध्ये (हृदयविकार रुग्णालय)काम करण्याचा पूर्वानुभव व प्रशिक्षण असल्याने त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने रुग्णाला सीपीआर(Cardiopulmonary Resuscitation)देण्यास सुरुवात केली.परिचारिका कविता यांनी कोणत्याही भीतीशिवाय अत्यंत कौशल्याने एकहाती(Single-handedly)रुग्णाला सीपीआर देऊन पुनरुज्जीवित(Revive)केले.रुग्णाची प्रकृती स्थिर (Settle)झाल्यानंतर,वैद्यकीय अधीक्षक डॉ.मिसार आणि डॉ.हीना यांच्या देखरेखीखाली पुढील उपचारासाठी रुग्णाला तात्काळ जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे सुरक्षितपणे संदर्भित(Refer)करण्यात आले.
  • ​जिल्हा शल्य चिकित्सकांकडून विशेष गौरव👇
या अभिमानास्पद कामगिरीबद्दल बोलतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे म्हणाल्या, ​”देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात डॉ.हीना यांच्या नियुक्तीमुळे आपण सिझेरियन सेवा सुरू करू शकलो,याचा आनंद आहेच. पण परिचारिका कविता यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि दिलेले प्रशिक्षण हे कौतुकास पात्र आहे.त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एक माता मृत्यू रोखला आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मिसार, डॉ.हीना आणि विशेषतः परिचारिका कविता यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते.अशा समर्पित कर्मचाऱ्यांमुळेच शासकीय आरोग्य सेवेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होतो.”
​सध्या संबंधित मातेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!