Wednesday, October 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदेशात असाही एक कलेक्टर..! पगार लाखो रुपये असूनही महिन्याला घेतात केवळ...

देशात असाही एक कलेक्टर..! पगार लाखो रुपये असूनही महिन्याला घेतात केवळ एक रुपया…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशामध्ये अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी आहेत जे चर्चेत असतात.मग टीना डाबी असोत की अन्य कुणी? यातच एक असेही आयएएस अधिकारी आहे; जे देशातल्या सगळ्यात श्रीमंत आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.परंतु ते महिन्याला केवळ एक रुपया वेतन घेतात,त्यामुळे त्यांची चर्चा देशभर होत आहे.
महिन्याला केवळ एक रुपया वेतन घेणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे अमित कटारिया.असे असूनही त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे.कटारिया हे मुळचे हरियाणातल्या गुरुग्राम इथले आहेत.सध्या छत्तीसगड येथे त्यांची पोस्टिंग आहे.तब्बल सात वर्षांच्या सेंट्रल वर्षांच्या सेंट्रल डेप्युटेशननंतर ते माघारी परतले आहेत.देशातल्या सर्वात श्रीमंत अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते.विशेष म्हणजे ते अनेकदा बातम्यामध्ये झळकतांना दिसतात.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीदरम्यान त्यांनी काळ्या रंगाचा चष्मा लावला होता.त्यामुळे ते चर्चेत आलेले होते.
अमित कटारिया एका उद्योजग कुटुंबातून येतात.रियल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शच्या व्यवसायात त्यांचे कुटुंबिय आहेत.त्यांचा व्यवसाय दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात पसरलेला आहे.या व्यवसायातून कटारिया कुटुंबाला मोठी कमाई होते.
रिपोर्ट्सनुसार,कटारियांची नेटवर्थ ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.वर्ष २०२१ मध्ये अमित कटारिया यांचे बेसिक वेतन ५६ हजार रुपये होते.इतर भत्ते मिळून त्यांचे वेतन १.४० लाख रुपयांपेक्षा जास्त होते.परंतु ते केवळ एक रुपया सॅलरी(वेतन)घेतात,यामुळे चर्चेत असतात. याशिवाय त्यांच्या पत्नी अस्मिता हांडा कमर्शियल पायलट आहेत.त्यांचे वेतनही लाखोंमध्ये आहे.
२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बस्तर दौऱ्यात कटारिया यांनी मोदींना भेटताना गडद चष्मा घातला होता.ही बाब सरकारी प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. त्यामुळे अमित कटारिया यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.त्यानंतर त्यांना बस्तरमधून प्रतिनियुक्तीवर दिल्लीला बोलावण्यात आले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!