Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीदुर्गम भागांतील नागरिकांना दर्जेदार तपासणीची सुविधा; अत्याधुनिक आरोग्य प्रयोगशाळेचे उद्घाटन..

दुर्गम भागांतील नागरिकांना दर्जेदार तपासणीची सुविधा; अत्याधुनिक आरोग्य प्रयोगशाळेचे उद्घाटन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे नवनिर्मित एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा(इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी )चे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून रोगनिदान,आजारांची देखरेख व प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मोठे बळ मिळणार आहे.
या प्रयोगशाळेमुळे संसर्गजन्य आजारांची तपासणी, पाणी व अन्ननमुने विश्लेषण,पर्यावरणीय नमुन्यांची चाचणी तसेच विविध जैविक तपासण्या एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.परिणामी आजारांचे लवकर व अचूक निदान होऊन वेळेत उपचार सुरू करता येणार असून संभाव्य साथरोगांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी उद्घाटक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा एस.लहाडे यांनी ही इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाची पायरी असल्याचे नमूद केले.या सुविधेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनाही दर्जेदार,विश्वसनीय व अचूक तपासणी सेवा उपलब्ध होईल,असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अविनाश टेकाडे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली तसेच डॉ.नितीन टिपले वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते.यावेळी सामान्य रुग्णालयातील डॉ. सचिन करंजेकर,शरीरविकृती शास्त्रज्ञ(वर्ग-१),डॉ. मुकुंद ढबाले,शरीरविकृती शास्त्रज्ञ यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय प्राध्यापक, सहाय्यक व सहयोगी प्राध्यापक,सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी,वैद्यकीय अधिकारी,प्रयोगशाळा कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत या प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी,वेगवान व लोकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!