- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दररोज भाव खाणाऱ्या सोने-चांदीच्या दरात आज,शुक्रवार २१ नोव्हेंबरला मोठी घसरण झाली. मौल्यवान धातूंचे दर कालच्या तुलनेत कमी झाले आहेत. आज सोने ७३२ रुपयांनी तर चांदी ४ हजार ४६५ प्रति किलोग्रॅमने कमी झाली आहे.काल गुरुवारी सकाळच्या सुमारास २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख २२ हजार ८८१ रुपये होता,तर आज सोन्याचा भाव १ लाख २२ हजार १४९ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.तर चांदीचा कालचा भाव १ लाख ५५ हजार ८४० प्रति किलोग्रॅम व आज १ लाख ५१ हजार २७५ प्रति किलोग्रॅम झाल्याने चांदीचा आजचा भाव ४ हजार ४६५ प्रति किलोग्रॅमने कमी झाली आहे.गेल्या आठवड्याच्या तुलनेत आतापर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव ३ हजार ०९ रुपयांनी स्वस्त झाला आहे.
- Advertisement -

