Friday, May 22, 2026
Homeअहेरीतेंदुपत्ता संकलन करतांना महिलेवर रान डूकराचा हल्ला…-महिला गंभीर जखमी; अहेरी उपजिल्हा रुग्णालयात...

तेंदुपत्ता संकलन करतांना महिलेवर रान डूकराचा हल्ला…-महिला गंभीर जखमी; अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

अहेरी(गडचिरोली) :- तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी पहाटे जंगलात गेलेल्या महिलेवर रान डूकराने हल्ला केला असल्याची घटना आज दिनांक- ११ मे रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.रान डूकराने हल्ला केलेल्या महिलेचे नाव अंजली राजेश्वर रामटेके असून शहरातील प्रभाग क्र. १६ चेरपल्ली येथील रहिवासी आहेत.सदर महिला गंभीर जखमी झाल्याने तिला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्हा जंगल व्याप्त असून हल्ली तेंदुपत्ता तोडण्याचे काम सर्वत्र सुरू झाले आहे.तेंदु पत्त्याच्या माध्यमातून अनेकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत असतो.अशातच जंगलात मोठ्या प्रमाणावर हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढल्याने अनेकजण हल्ल्यात गंभीर जखमी वा ठार होतांना दिसून येतात.असाच प्रकार आज सकाळच्या सुमारास घडून आला असल्याने तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.एखादे वेळी जंगलात अनुचित प्रकार घडल्यास यांस जबाबदार कोण? असा सवाल अनेकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!