Saturday, October 17, 2026
Homeगडचिरोलीतुम्हाला हे ठाऊक आहे काय? सात बाऱ्यावर वारसानांची नावे चढवायची असल्यास कुठल्याही...

तुम्हाला हे ठाऊक आहे काय? सात बाऱ्यावर वारसानांची नावे चढवायची असल्यास कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही…- शेतकरी बांधवांची होतेय लूट….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त (संपादकीय)

गडचिरोली :- कित्येकदा वारसान फेरफार नोंदी करिता आपण ऐकत असतो की, कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावे शेतजमीन आहे;असा व्यक्ती मरण पावल्यास कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे सात बाऱ्यावर नाव नसल्यास नावे चढविण्यासाठी

एवढे पैसे लागतात वा तेवढे पैसे लागतात म्हणून असे कुणीही सांगत असेल तर तो आपल्याला चुना लावत आहे;असे समजावे.सात बाऱ्यावर कुटुंबातील व्यक्तींचे नावे चढविणासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही.कुणी जर का पैसे मागत असेल तर संबंधित व्यक्तीच्या विरोधात सरळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फोन करा.गुगलवरती सर्च इंजिनमध्ये जिल्ह्याचे नावासोबत एसीबी असे टाईप करा व सरळ तक्रार करा.

बऱ्याच पैकी शेतकऱ्यांनी पैसे लागतात म्हणून कुटुंबातील वारसांनाची नावे सात बाऱ्यावर अनेक महिन्यांपासून वा वर्षांपासून चढविलेली नाहीत.कारण की आम्हाला याची माहितीच नसल्याने असे होते आहे.याकरिता वारसान नोंदीची प्रक्रिया कागदपत्रे गोळा करणे व संबंधित साज्यातील तलाठ्यास नेऊन देणे असून त्याकरिता कुठलीही फी वा पैसे लागत नाही.वारसान फेरफार नोंदी करीता फेरफार अर्ज,पाच रुपयाची तिकीट,जी व्यक्ती मयत झाली अशाचा मृत्यू दाखला,अर्ज दाराची एक फोटो,चालू सात बारा,वारसान प्रमाणपत्र ग्रामपंचायत सरपंच,पोलीस पाटील यांचा,नावे चढविणाऱ्यांची आधार कार्ड,नावात बदल असेल तर १०० रुपयाचे स्टॅम्प पेपर,जसे-लग्न झाल्यानंतर नावात बदल होतो;एवढी कागदपत्रे गोळा करून गावातील तलाठ्यास सादर करावे.वारसान फेरफार नोंदी करीता कुणालाही पैसे देण्याची गरज नाही.

आम्हाला हीच गोष्ट माहित नसल्याने वा शेतकरी बांधव निरक्षर असल्याने त्यांची फसवणूक केली जात आहे.एका व्यक्तीने चक्क सात बाऱ्यावर नाव चढवून देतो; असे म्हणून दोन ते दीड हजार रुपये लागणार असल्याचे सांगितले.अशाप्रकारे कित्येकदा अनेकांची फसवणूक करून पैसे लुबाडण्याचे काम सुरू असल्याने कुणाच्याही भानगडीत न पडता;आपले काम स्वतः वा योग्य व्यक्तीला पकडूनच करावे. जेणेकरून आपली फसवणूक टाळता येईल.जो कुणी पैसे मागीत असेल त्याला आणून देतो वा नंतर देतो म्हणून सांगा व लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळवून ‘दे बत्ती’ असे करावे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!