Wednesday, October 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तडिसेंबरमध्ये राहणार हिमयुग अवतरल्यासारखे वातावरण.. - राज्यात १ डिसेंबरपासून कडाक्याची थंडी;...

डिसेंबरमध्ये राहणार हिमयुग अवतरल्यासारखे वातावरण.. – राज्यात १ डिसेंबरपासून कडाक्याची थंडी; हवामान विभागाने वर्तवला अंदाज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत राज्यात थंडीचा तडाखा वाढू लागला आहे.ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास शेकोट्या पेटू लागल्या आहेत.अशातच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळासारखी स्थिती तयार होऊन हिमालयात २९ नोव्हेंबर पासून पश्चिमी चक्रावात सक्रिय होत आहे.अशा परस्परविरोधी वातावरणामुळे विचित्र हवामान तयार होत असल्याने बोचरी थंडी अन् बाष्पयुक्त वारे राज्यात वाहणार आहे.त्यामुळे डिसेंबरची सुरुवात कडाक्याच्या थंडीने होईल,असा नवा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने डिसेंबरमध्ये कमी थंडीचा अंदाज रविवारी दिला होता.मात्र,सोमवारी दुपारी देशाच्या वातावरणात अचानक मोठा बदल झाला.बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती तयार झाल्याने दक्षिण व पूर्व भारतात पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडे हे वारे वेगाने येत आहे.तर हिमालयात थंडी बळकट करणारा पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने डिसेंबरमध्ये हिमयुग अवतरल्यासारखे वातावरण राहणार आहे.उत्तरेतून थंडी अन् दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे राज्याकडे येत आहे.त्याची सुरुवात २९ नोव्हेंबरपासून होईल मात्र, थंडीची तीव्रता १ डिसेंबरपासून वाढणार असल्याचा अंदाज आहे.
पश्चिम हिमालयीन प्रदेशावर २९ नोव्हेंबर रोजी पश्चिमी चक्रवात तयार होत आहे.त्यामुळे उत्तर भारताकडून थंडी तर दक्षिणेकडून पावसाचा प्रभाव असल्याने हवेत जास्त बाष्प अन् थंडी असे मिश्र वातावरण राहण्याची शक्यता आहे.तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये काही ठिकाणी गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!