Monday, August 10, 2026
Homeगडचिरोलीट्रकची दुचाकीला धडक; तीन भावंडे जखमी.. - दोघांचे पाय मोडले..

ट्रकची दुचाकीला धडक; तीन भावंडे जखमी.. – दोघांचे पाय मोडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-टाईल्सची कामे करणाऱ्या दुचाकीस्वार तीन भावंडांच्या लोहखनिज वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघातात दोन भावंडांच्या पायाचे हाड मोडले,तर एकास किरकोळ दुखापत झाल्याची घटना आज,गुरुवार २२ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास चामोर्शी तालुक्याच्या चौडमपल्ली गावाजवळ घडली.घटना घडताच ट्रक चालक ट्रकसह फरार झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.अपघातात २२ वर्षीय तेजसिंग राजपूत, २४ वर्षीय दिपक राजपूत व २३ वर्षीय अशोक राजपूत अशी जखमी तिन्ही भावंडांची नावे असून तिघेही गुजरात राज्यातील रहिवासी आहेत.ते टाईल्सची कामे करण्यासाठी हल्ली गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील गुंडापल्ली येथे मुक्कामी आहेत.
आज गुरुवारी सकाळच्या सुमारास दुचाकिस्वार तिन्ही भावंडे गुंडापल्ली गावाहून परिसरातील धनूर या गावी टाईल्स लावण्याच्या कामाकरीता निघाले होते.अश्यातच चौडमपल्ली गावाजवळ येताच आलापल्लीकडून येणाऱ्या मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक बसताच तिघेही दुचाकीवरून खाली कोसळले.यात दोघांना जबर मार लागला,तर एकास किरकोळ दुखापत झाली.घटना घडताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.दरम्यान,त्याच मार्गावरून येत असलेल्या भावाने आष्टी येथे अपघाताची माहिती दिली असता चामोर्शी तालुक्याच्या आष्टी येथील श्री छत्रपती शिवस्वराज्य बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या सदस्यांना झालेल्या अपघाताची माहिती मिळताच संस्थेच्या सदस्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तात्काळ आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.दोघांचे पायाचे हाड मोडले असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ हलविण्यात आले.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस प्राशन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!