Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांचा सत्कार..

ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांचा सत्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा आज,सोमवार २३ मार्च रोजी गडचिरोली बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक सचिन नेवारे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
एसटी गोंडवाना सगाजन समिती व राज्य परिवहन  विभाग गडचिरोली येथील रंगकर्मी व कर्मचारी वृंद यांचेतर्फे वीर बाबुराव शेडमाके यांच्या १९३ व्या जयंतीदिनानिमित्त नुकतेच ११ मार्च रोजी “गोंडवानाचा महायोद्धा: क्रांतिवीर बाबुराव शेडमाके” या नाटकाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे लेखन प्रसिद्ध नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी केले असल्याने एसटी गोंडवाना सगाजण समिती व रा.प.म.कर्मचारी वृंद यांच्या वतीने या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी या नाटकाचे दिग्दर्शक राजरत्न पेटकर,प्रसिद्ध रंगकर्मी अशोक सुत्रपवार, भास्कर आत्राम(मुख्य सल्लागार, एस टी गोंडवाना सगाजण समिती),प्रवीण तलांडे (अध्यक्ष,एसटी गोंडवाना सगाजन समिती),अमोल जोनमवार व निशिकांत ऊईके(रंगकर्मी व एसटी कर्मचारी)तथा कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.एसटी महामंडळ कर्मचारी वृंदा तर्फे या नाटकाचे दोन प्रयोग यशस्वीरित्या सादर करण्यात आलेले असून नाटकातील कलावंतांना रा.प.म.नाट्यस्पर्धेत अभिनयाचे पुरस्कारदेखील प्राप्त झाले आहेत.याबद्दल नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी त्यांचे कौतुक केले व सत्काराबद्दल आभार मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

पोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. – तरुणावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये एकमेकांविषयी आकर्षण वाढते आणि तिथूनच पुढे सुरू होतेय अनोखी 'लव्हस्टोरी' ही काही सांगण्याची गरज नाही.पण,अल्पवयीनांची 'लव्हस्टोरी' चिरकाल टिकणारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!