- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-कर्तव्यावर असतांना झालेल्या अपघाताची नुकसान भरपाई मिळावी यासाठी दाखल गुन्ह्याच्या दोषारोपपत्राची प्रत देण्यासाठी ३ हजाराच्या लाचेची रक्कम मागणी करणाऱ्या एका पोलीस हवालदारास आज,बुधवार १ जुलै रोजी नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.विशेष म्हणजे, प्रकरणातील तक्रारदार हे पोलीस विभागात कार्यरत असून त्यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात
आहे; तर लाच स्वीकारणारा हा पोलीस विभागातील पोलीस हवालदार असल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे पोलीस विभागात कार्यरत असून ते कर्तव्यावर असतांना त्यांचा अपघात झाल्याने त्यांचे तक्रारीवरून नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात
गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा
तपास हा पोलीस स्टेशन गणेशपेठ येथील पोलीस हवालदार अतिष निकोडे वय ४७ वर्षे यांनी केलेला होता.तक्रारदार यांनी अपघातात नुकसान भरपाई मिळण्याकरिता न्यायालयात केस दाखल केली होती. त्याकरिता त्यांना अपघाताच्या गुन्ह्याच्या दोषारोपपत्राच्या(चार्जशीट)प्रतीची आवश्यकता होती. यासाठी नमूद गुन्ह्याच्या दोषारोपपत्राची प्रत मिळण्याकरिता तक्रारदार हे पोलीस हवालदार अतिष निकोडे यांना जावून भेटले असता पोलीस हवालदार अतिष निकोडे यांनी तक्रारदार यांना ३ हजार रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी ॲन्टी करप्शन ब्युरो नागपूर कार्यालयात तक्रार केली होती.सदर तक्रारीचे अनुषंगाने सापळा अधिकारी यांनी लाचेच्या मागणीबाबत पडताळणी कार्यवाही केली असता आज बुधवारी पडताळणी कार्यवाही दरम्यान तक्रारदार यांना चार्जशिटची प्रत देण्याकरिता ५ हजार रूपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता ३ हजार रूपये लाच रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.त्यावरून,आरोपी पोलीस हवालदार अतिष निकोडे यांचेविरूध्द नागपूर शहराच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई डॉ.दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर,श्रीमती माधुरी बाविस्कर,अप्पर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर,विजय माहुलकर,अप्पर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक महेश भोरटेकर सापळा पथक पोलीस निरीक्षक जितेंन्द्र वैरागडे,पोहवा आशिष वैद्य, विलीन तांबडे,पोशि होमेश्वर वाईलकर,प्रफुल भातुलकर,स्वाती हिंडोरिया चालक पोहवा राजेंन्द्र जांभुळकर यांनी केली.
- Advertisement -

