Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीगोसेखुर्द धरणाचे १५ दरवाजे खुले; तर चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडले..

गोसेखुर्द धरणाचे १५ दरवाजे खुले; तर चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यासह भंडारा,गोंदिया,चंद्रपूर, नागपूर व राज्यातील विविध जिल्ह्यात कोसळधारा पडलेल्या पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळित केले.अश्यातच आता हवामान खात्याने उद्या,गुरुवार २१ ऑगस्ट पासून राज्यात पाऊस शांत बसणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.मात्र,दोन दिवसांपासून धूम ठोकणाऱ्या पावसामुळे विविध नद्यांच्या तसेच धरणांच्या पाणी पातळीत कमी अधिक वाढ झाली आहे.त्यातच भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरणाऱ्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने आज,बुधवार २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजे ३३ पैकी १५ दार उघडण्यात आले असून १ हजार ८०१ पाण्याचा विसर्ग,तर ६३,६११ क्युमेक्स पाण्याचा प्रवाह सुरू आहे.
वैनगंगा नदीची आष्टी स्टेशनवर,पाण्याची पातळी इशारा पातळीच्या वर स्थिर आहे.मात्र,देसाईगंज (वडसा)आणि चिचडोह बॅरेज येथे वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
  • धरण विसर्ग सध्याची स्थिती👇
चिचडोह बॅरेज- गेट सुरु-३८ पैकी ३८ गेट उघडलेले
विसर्ग- १०,५९३ क्युमेक्स (३,७४,०९२ क्युसेक्स)
निम्न वर्धा प्रकल्प- गेट सुरु-३१ पैकी १९ गेट उघडलेले,विसर्ग-५०५ क्युमेक्स (१७,८५६ क्युसेक्स)
श्रीराम सागर प्रकल्प- गेट सुरु-४२ पैकी १६ गेट उघडलेले,विसर्ग-१४९७ क्युमेक्स (५२,८५० क्युसेक्स)
श्रीपदा येलमपल्ली प्रकल्प- गेट सुरु-६२ पैकी ४० गेट उघडलेले,विसर्ग-१५१५७ क्युमेक्स (५,३५,२८२ क्युसेक्स)
मेडीगड्डा बॅरेज- गेट सुरु-८५ पैकी ८५ गेट उघडले,
विसर्ग- २८,५३० क्युमेक्स (१०,०७,५३० क्युसेक्स)
  • प्रमुख नद्यांची सध्याची पाणी पातळी👇
वर्धा नदी- सिरपूर टाऊन स्टेशनवर,वर्धा नदी इशारा पातळीच्या वर स्थिर वाहत आहे.
प्राणहिता नदी-अहेरी गुडम स्टेशनवर,प्राणहिता नदी इशारा पातळीच्या वर वाढत आहे.
गोदावरी नदी- कालेश्वरम स्टेशनवर,गोदावरी नदी इशारा पातळीच्या वर वाढत आहे.
इंद्रावती नदी- चिंदनार,जगदलपूर आणि पाथागुडम स्टेशनवर,नदीची पाणी पातळीइशारा पातळीच्या खाली कमी होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!