Tuesday, September 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगॅस सिलेंडरची भयावह स्थिती; गॅस न मिळाल्याने हतबल झालेली आजी रडली ढसाढसा..

गॅस सिलेंडरची भयावह स्थिती; गॅस न मिळाल्याने हतबल झालेली आजी रडली ढसाढसा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशात स्वयंपाकाच्या गॅस संकटाची परिस्थिती भयावह होत चालली आहे.सरकार गॅसची टंचाई केवळ अफवा असल्याचे सांगत ही स्थिती हाताळण्यासाठी ५० हजार कोटींचा अतिरिक्त निधी ठेवण्याची भाषा करत असले,तरी वस्तुस्थिती फार वेगळी आहे.पंजाबच्या बर्नाला येथे गॅससाठी रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्धाच्या मृत्यूनंतर,आता उत्तर प्रदेशातील फरुखाबादमध्ये ७६ वर्षांचे मोहम्मद मुख्तियार यांनी सकाळी साडे सहा वाजता रांगेत उभे असतांनाच प्राण गमावले.या दोन्ही वृद्धांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला आहे.हजारो हॉटेल्स, रेस्टॉरंट्स,शाळांचे मेस आणि हायकोर्टाचे किचन बंद झाल्यानंतर आता गॅस टंचाई संसदेपर्यंत पोहोचली आहे.काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी दावा केला की,देशात गॅसची कमतरता आहे,यात शंका नाही.मी रोजा ठेवत आहे,पण संसदेत चर्चेचा विषय हा होता की,जेव्हा खासदारांनी संसद कॅन्टीनमध्ये चहा किंवा कॉफी मागितली,तेव्हा ती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.तरीही सरकार दावा करत आहे की घाबरण्याचे कारण नाही.
अमृतसरमधील इस्लामाबाद येथील ‘देश भगत गॅस एजन्सी’मध्ये सिलिंडरवरून मॅनेजर आणि ग्राहकामध्ये जोरदार भांडण झाले.गॅस न मिळाल्याने हतबल झालेली एक वृद्ध महिला एजन्सीबाहेरच ढसाढसा रडू लागली,ज्यामुळे लोकांचा संताप अनावर झाला आणि त्यानी एजन्सीमध्ये तोडफोड केली. या महिलेला सहा तास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळाले नव्हते. लुधियानात तर सिलिंडर घेऊन घरी परतणाऱ्या एका व्यक्तीकडून दुचाकीस्वार तरुणांनी भररस्त्यात सिलिंडर हिसकावून नेल्याची घटना घडली.केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिडरवरील बंदी उठवली आहे.पेट्रोलियम मंत्रालयाने शनिवारी जाहीर केले की २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे वितरण पुन्हा सुरू झाले आहे.सरकारने ९ मार्च रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यावर बंदी घातली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!