Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीगॅस सिलेंडरचा काळाबाजार; ११२ ठिकाणी छापे.. - ४ सिलेंडर जप्त; एकावर गुन्हा...

गॅस सिलेंडरचा काळाबाजार; ११२ ठिकाणी छापे.. – ४ सिलेंडर जप्त; एकावर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-घरगुती गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार आज,शनिवार १४ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली विशेष तपासणी करण्यात आली.या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण ११२ ठिकाणी तपासण्या व छापे टाकण्यात आले.
या धडक कारवाईदरम्यान प्रामुख्याने व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर तसेच अनधिकृत साठवणूक यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.या मोहिमेत सर्वाधिक तपासण्या गडचिरोली(३०) आणि धानोरा (२२) तालुक्यात करण्यात आल्या.तपासणीदरम्यान पुढीलप्रमाणे गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले-
गडचिरोली तालुका : २ गॅस सिलिंडर जप्त (मूल्य सुमारे ₹६,०००)
चामोर्शी तालुका : १ गॅस सिलिंडर जप्त (मूल्य सुमारे ₹३,०००)
मुलचेरा तालुका : १ गॅस सिलिंडर जप्त (मूल्य सुमारे ₹३,७६०)
या कारवाईत जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण ४ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून जप्त केलेल्या मालाचे एकूण मूल्य ₹१२,७६० इतके आहे.
फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू👇
अवैध साठवणूक व वापर आढळलेल्या प्रकरणांमध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
मुलचेरा येथे १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली व चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गॅस सिलिंडरचा काळाबाजार,अवैध साठवणूक किंवा व्यावसायिक वापर आढळल्यास नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल,असा इशारा दिला असून जिल्ह्यात ही तपासणी मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!