Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीगॅस दर वाढीच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीने केंद्रातील भाजप सरकारचा केला निषेध...

गॅस दर वाढीच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीने केंद्रातील भाजप सरकारचा केला निषेध…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- घरगुती इंधन गॅस दर वाढीच्या विरोधात गडचिरोली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारचा गांधी चौक गडचिरोली येथे शिवसेना महिला आघाडी संघटीका छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांच्या उपस्थितीत जाहीर निषेध करण्यात आला.

काही वर्षा पूर्वी केंद्रात काँग्रेस शासन असताना च्या काळात साडेतीनशे रुपये चे गॅस सिलेंडर मिळत होते परंतु केंद्रात  भाजपा चे सरकार आल्या पासून महागाई सपाट्याने वाढण्यास सूरवात झाली खाण्याचे तेला चे भाव वाढले पेट्रोल डिझलचे चे भाव वाढले वाढत्या महागाई मुळे सर्व साधारण लोकांचे जगणे कठीण झाले आहे.महागाई मुळे भाजपने गरीब लोकांना सडो की पळो करून सोडले आहे.यातच घरगुती गॅस सिलेंडरच्या दत ५० रुपयांनी वाढ केली.सुरवातीला उज्वला गॅस गोर गरिबांना  मोफत दिले व नंतर ५०० रू किंमतने गॅस दिले.

आता उज्वला योजनेतील नागरिकांनाही ११०० रुपये द्यावे लागतात.गॅसच्या भाववाढीमुळे अनेक महिलांनी गॅसवर स्वयंपाक करणे सोडून लाकूड जाळून स्वयंपाक करणे सुरू केले असल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.जाहीर निषेध प्रसंगी केंद्र शासन मुर्दाबादचे नारे लावण्यात आले.प्रसंगी छायाताई कुंभारे यांनी म्हटले की,केंद्रातील भाजप सरकारने नेहमी नेहमी महागाई वाढवून आम्हा महिलांचे जिने हराम केले आहे.कसबा,चीचवडची निवडणूक पाहून तसेच कोणतीही निवडणूक पाहून भाव कमी करायचे आणि निवडणूक नंतर दुपटीने भाववाढ करायचे हे भाजप सरकारचे धोरण आहे. येत्या काळात पुन्हा भाववाढ करण्यात आली तर शिवसेना महिला आघाडी याही पेक्षा तीव्र आंदोलन करेल.असे छायाताई कुंभारे यांनी म्हटले.

निषेध प्रसंगी जोत्सना राजूरकर,नूतन कुंभारे,देवकी कंकडालवार,आरती खोब्रागडे,रिंकू वासलवार,संध्या हेमके,रीहानी दीक्षित,माधुरी राजूरकर,सुलभा राजूरकर,रेखा कुमरे,यामिना आलाम,सपना मेश्राम, संगीता रामटेके,अपूर्वा कटकवार,शिरसागर ताई,वैशु ताई व शेकडो महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!