Sunday, June 28, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीत शिवसेना पदाधिकारी वेटींग लिस्टवर; प्रभारींकडेच कारभार.. - नव्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घोषणेची...

गडचिरोलीत शिवसेना पदाधिकारी वेटींग लिस्टवर; प्रभारींकडेच कारभार.. – नव्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घोषणेची उत्सुकता शिगेला; चेंडू पक्षश्रेष्ठींकडे- डॉ.श्रीकांत बनसोड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली):-मागील कालावधीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या सोशल मीडियावर  झालेल्या अभूतपूर्व चिखलफेकीनंतर,विदर्भातील  पूर्वेकडील गडचिरोली जिल्ह्याच्या शिवसेना पक्षात नव्याने घोषित करण्यात आलेल्या प्रभारी पदाधिकाऱ्यांकडेच कारभार असल्याने नवे शिवसेना पदाधिकारी नियुक्तीच्या वेटींग लिस्टवर आहेत.या पार्श्वभूमीवर,गडचिरोली जिल्ह्यातील नियमित पदाधिकारी घोषित होणार की नाही? याबाबत उत्कंठा शिगेला पोहचली आहे.पक्षाची वज्रमूठ बांधण्यासाठी आणि जनसामान्यांची बाजू लावून धरण्याची क्षमता लक्षात घेऊनच पुढील निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.अशातच सध्याच्या घडीला चेंडू हा पक्षश्रेष्ठींकडे असून,अंतिम निर्णय त्यांच्याच हातात असल्याचे माजी जिल्हा समन्वयक डॉ.श्रीकांत बनसोड यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना ही अनादिकाळापासून सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे काम करीत आहे.अशातच पक्ष संघटन महत्त्वाचे असल्याने नव्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घोषणा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.गडचिरोलीत शिवसेनेच्या संघटनात्मक घडामोडींकडे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून,या निर्णयाने स्थानिक राजकारणात नवा रंग भरला जाणार कां,हेही पाहणे तितकेच उत्सुकतेचे ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!