Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीत जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू...

गडचिरोलीत जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू नये- जिल्हा पुरवठा अधिकारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मध्यपूर्व आशिया,अमेरिका व युरोपियन खंडात सुरू असलेल्या युद्धजन्यपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पेट्रोल,डिझेल तसेच एल.पी.जी.गॅस साठ्याचा आढावा घेतला आहे. संबंधित तेल कंपन्यांनी जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचे कळविले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड,हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड,इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच रिलायन्स पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांकडून गडचिरोली जिल्ह्यात पेट्रोल,डिझेल, स्नेहक तसेच एल.पी.जी.गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन,पोलीस प्रशासन तसेच संबंधित तेल कंपन्यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल साठ्यावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू नये, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!