Sunday, May 3, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली सरपंच संघटनेचा उजळणी प्रशिक्षणास विरोध.. - प्रशासन व अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार नियोजन...

गडचिरोली सरपंच संघटनेचा उजळणी प्रशिक्षणास विरोध.. – प्रशासन व अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार नियोजन करण्याचा ठपका…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मागील महिन्यात सत्र संचालक राष्ट्रीय ग्रामस्वराज्य संस्था यशादा पुणे यांनी सन २०२४-२५ वर्षाकरिता सरपंच उजळणी प्रशिक्षणाबाबत जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीचे सरपंच यांना पत्राद्वारे कळविण्यात आले होते.त्यानुसार सरपंच संघटना गडचिरोली यांनी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियाना अंतर्गत होणाऱ्या उजळणी प्रशिक्षणास विरोध दर्शवित उपस्थित न राहण्याचा एकमताने निर्णय घेत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांना गडचिरोली जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्फतीने १३ ऑगस्ट रोजी निवेदन सादर केले आहे.

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियाना अंतर्गत प्रशासन आणि अनेक संस्थांमार्फत सरपंच तथा ग्रामपंचायत कमिटीला विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहेत.अशातच १५ वा वित्त आयोग व इतर योजने मार्फत ग्रामपंचायती अंतर्गत अनेक कामांचे नियोजन करण्यात येते. मात्र,सरपंच तथा ग्रामपंचायत कमिटीला विश्वासात न घेता प्रशासन व अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार नियोजन करण्यात येते.गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्यामुळे ग्रामपंचायतीचा जिल्हा परिषद व पंचायत समितीला मिळणारा निधी ग्रामपंचायतीला मिळाला नाही.त्यामुळे ग्रामपंचायतींचा विकास खुंटला आहे.सदर प्रशिक्षणामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामे,नियोजन आराखडे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.परंतु त्या प्रशिक्षणाचा गावच्या विकासासाठी कुठलाही फायदा होतांना दिसून येत नाही.ग्रामपंचायत अंतर्गत अत्यावश्यक पायाभूत सुविधा दुर्लक्षित होतात.त्यामुळे ग्रामपंचायत कमिटीवर जनतेचा असंतोष निर्माण होऊ लागला आहे.ग्रामपंचायत कमिटीने नियोजन केलेल्या आराखड्याला शासन केराची टोपली दाखवीत आहे; त्यामुळे सरपंच संघटना गडचिरोलीचे पदाधिकारी व सरपंच सदर प्रशिक्षणामध्ये येण्यास इच्छुक नसल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन सादर करतेवेळी गडचिरोली सरपंच संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अपर्णा राऊत,सरपंच विजय दडमल,प्रवीण मडावी,उषा शेडमाके,शेवंता हलामी,छाया बोगा,सुनील सयाम,सरील मडावी,श्रीराम हीचामी,चेतन सुरपाम,कुंती हुपंडी,ममता शहारे,एविता हलामी,कौशल्या काटेंगे, मधुकर मेश्राम,रमेश तुलावी,रमदेवल हलामी,दादाजी वालदे,कुंदा गायकवाड,भारती जुगनाके,हेमलता चौरसिया,सुरेखा आचले, देवराम मडावी व इतर सरपंच उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!