Sunday, June 21, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारीसाठी डॉ.रवींद्र सुरपाम इच्छुक…-जिल्हा काँग्रेस कार्यालयात दाखल केला उमेदवारी...

गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारीसाठी डॉ.रवींद्र सुरपाम इच्छुक…-जिल्हा काँग्रेस कार्यालयात दाखल केला उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-गडचिरोली विधानसभा क्षेत्रातुन उमेदवारी मिळण्यात यावी; या करीता डॉ.रवींद्र सुरपाम यांनी शिष्ट मंडळासह गडचिरोली जिल्हा काँग्रेस कार्यालयाचे शहराध्यक्ष्य सतीश विधाते तसेच जिल्हा उपाध्यक्ष सालोटकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.

पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहेत.आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळावे; यासाठी अनेकजण भेटी गाठीचे सत्र,सामाजिक कार्य,डोअर टू डोअर हात मिळवणी, आर्थिक मदत व इतर अशी अनेक कार्ये करतांना दिसून येत आहेत.मात्र,सध्या तरी कोणत्या विधासभा क्षेत्रातून कुणाला उमेदवारी मिळेल व कोण मैदानात उतरेल हे निश्चित ठरलेले नाही.अशातच आता एक नवी माहिती समोर आली आहे.गडचिरोली विधानसभा क्षेत्रातुन निवडणूक लढविण्याकरीता उमेदवारी मिळावी म्हणून चक्क डॉ.रवींद्र सुरपाम यांनी काँग्रेसच्या शिष्ट मंडळासह उमेदवारी अर्ज दाखल करीत मागणी केली आहे.

डॉ.रवींद्र सुरपाम हे गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील रहिवासी असून  अतिशय संयमी,शांत स्वभावी,मृद भाषी असा त्यांचा स्वभाव आहे.त्यांनी भामरागड तालुक्यात आरोग्य सेवा दिली असुन सामाजिक कार्यात स्वतःला वाहुन घेतले आहे.२०१० पासुन मुली वाचवा संदेश अभीयानाची सुरवात केली.सदरची सेवा अजुनही निरंतर सुरु आहे.विद्यार्थी,महीला,आबालवृद्ध यांच्या करीता योजनेची माहीती व प्रसाराचे कार्य करीत असतात.आर्युवेद घरा-घरा पर्यंत पोहचवा; यासाठी ते निरंतर कार्यशील असून समाजसेवेचा ध्यास असनारे डॉ.रविंद्र नारायण सुरपाम हे आता राजकारणातील नवा चेहरा म्हणून पाहीले जात आहे.त्यामुळे गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारीसाठी डॉ.रवींद्र सुरपाम इच्छुक असून त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळावी; अशी मागणी केली जात आहे.

उमेदवारी साठी अर्ज दाखल करतांना काँग्रेसचे  चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत,जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे,जिल्हा उपाध्यक्ष निलकंठ निखाडे, माजी उपसभापति माधव घरामी,गंगाधर पाल अध्यक्ष कुणबी समाज संघटना,दिगांबर धानोरकर विदर्भ अध्यक्ष ग्राम संवाद सरंपच अशोशियन,प्रभाकर गव्हारे सामजिक कार्यकर्त,प्रेमानंद गोगले उपाधक्ष युवक कॉग्रेस,रोशन कोहळे सचिव युवक काँगेस,डॉ.मनिष रोहणकर,मिथुन पाल सरपंच नेतानीगार,कर्थिकर्मे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!