Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली व कुरखेडाच्या दादापुर येथील रुग्णांना मिळाली मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत..

गडचिरोली व कुरखेडाच्या दादापुर येथील रुग्णांना मिळाली मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दोन गरजू रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे.यामध्ये , गडचिरोलीच्या गोकुलनगर येथील रहिवासी किरण दिनेश कोहचाळे तर कुरखेडा तालुक्याच्या दादापूर येथील तथागत मोहन वैद्य यांचा समावेश आहे.हे दोन्ही रुग्ण सध्या नागपूर येथे उपचार घेत असून किरण कोहचाळे यांना हृदयरोगाच्या उपचारासाठी तर तथागत मोहन वैद्य यांना मेंदूरोगाच्या उपचारासाठी मदत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून पूर, दुष्काळ,आगसदृश्य नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत केली जाते. तसेच,हृदय,किडनी,यकृत,फुफ्फुस प्रत्यारोपण, कर्करोग,अपघात,नवजात शिशूंचे आजार,मेंदू विकार, डायलिसीस अशा महागड्या उपचारांची गरज भासणाऱ्या रुग्णांना मदत मंजूर केली जाते.यापूर्वी
३ जून २०२५ रोजी कुरखेडा येथील अविनाश दुबे यांना हृदयविकारावरील उपचारांसाठी एक लाख रुपयांची मदत या कक्षाच्या माध्यमातून करण्यात आली होती.त्यानुसार आता जिल्ह्यातील तीन रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इतर गरजू आणि पात्र रुग्णांनीही मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ घेण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता कक्षाशी संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.यामुळे अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळू शकते.मुख्यमंत्री सहायता निधी गरजू रुग्णांना त्यांच्या गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत देऊन आधार देत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!