- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.
या उपक्रमाचे ३९ वे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून,त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवी ऊकंडराव नारायण राऊत यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “अर्धांगिनी” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
ऊकंडराव नारायण राऊत हे पोर्ला (जिल्हा- गडचिरोली) येथील रहिवासी असून ते जिल्हा परिषद गडचिरोली येथून केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांना भजनाची व गाण्याची विशेष आवड असून नवोदित कवी आहेत.शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी गीते तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे,दादा चुधरी, दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
३९ व्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा.पी.एस. बनसोडे,पुनाजी कोटरंगे,गजानन गेडाम,अजय राऊत, गणेश रामदास निकम,संगीता ठलाल,तुळशीराम उंदीरवाडे,जयराम धोंगडे,रेखा दिक्षित,प्रिती ईश्वर चहांदे,वामनदादा गेडाम,सोनाली रायपुरे-सहारे,डॉ. मंदा पडवेकर,लता शेंद्रे,मुरलीधर खोटेले,रोहिणी पराडकर,वंदना मडावी,वंदना सोरते,सुरेश गेडाम, यामिनी मडावी,कृष्णा कुंभारे,सुभाष धाराशिवकर, सुनिल चडगुलवार,सिध्दार्थ गोवर्धन,सोनू अलाम, विलास टिकले,ऊकंडराव नारायण राऊत,पुरुषोत्तम दहिकर,चरणदास वैरागडे,शैला चिमड्यालवार, ज्योत्स्ना बंसोड,केवळराम बगमारे,खुशाल म्हशाखेत्री, पी.डी.काटकर,संगीता रामटेके इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.३९ व्या सत्रातील पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
- Advertisement -

