- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.
या उपक्रमाचे छत्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कवी भिमानंद एस.मेश्राम यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “पावसाचे राजकारण” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे तसेच कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
भिमानंद एस.मेश्राम हे ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून प्रसिद्ध कवी,गायक,नाट्य कलावंत व नाटककार आहेत.डॉ.आंबेडकर फेलोशिप अवार्ड, विदर्भ भुषण पुरस्कार,मानव भुषण पुरस्कार,नाट्यश्री पुरस्कारासह अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत. त्यांचे ‘झाली रमाई महान’ हे नाटक झाडीपट्टीत गाजलेले आहे.अनेक कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.त्यांच्या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
छत्तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा.पंढरी बनसोडे,जयराम धोंगडे,माधुरी अमृतकर,डॉ.चंद्रकांत लेनगुरे,नरेंद्र गुंडेली,विलास टिकले,राजरत्न पेटकर, सुनील चडगुलवार, मुर्लीधर खोटेले,पी.डी.काटकर, सुभाष धाराशिवकर,संगीता ठलाल,वंदना सोरते,वंदना मडावी,सोनाली रायपुरे,डॉ.मंदा पडवेकर, वामनदादा गेडाम,कृष्णा कुंभारे,सुरेश गेडाम,रोहिणी पराडकर, संगीता रामटेके,भिमानंद मेश्राम,तुळशीराम उंदीरवाडे, उकंडराव राऊत,प्रेमिला अलोने,पुरुषोत्तम दहिकर, रेखा दिक्षित,सुरज गोरंतवार,डॉ.मंदाकिनी चरडे,गणेश रामदास निकम,मिलींद बी.खोब्रागडे,वसंत चापले,अजय राऊत, सुजाता अवचट,केवळराम बगमारे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार; असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
- Advertisement -

