Wednesday, September 30, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार बहिणींना मिळाले तीन हजार रुपये... -...

गडचिरोली जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार बहिणींना मिळाले तीन हजार रुपये… – आधार जोडणी पूर्ण करणाऱ्या उर्वरित बहिणींनाही मिळणार लाभ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार बहिणींना मिळाला असून त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहे.या योजनेचा लाभ वितरण सोहळा आज,शनिवार १७ ऑगस्टला नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा शल्य चिकित्सक माधुरी किलनाके,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव,कार्यक्रम अधिकारी अर्चना इंगोले,बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती कडू,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतिश सोळंके,अमित साळवे, सामाजिक कार्यकर्त्या योगिता पीपरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ संपूर्ण राज्यात मिळत आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ प्रथमच देण्यात येत असून प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी सांगितले.शासनाने या योजनेसाठी पुढील मार्च महिन्यापर्यंत अर्थसंकल्पीय तरतुद केली असल्याने निवडणूकीनंतर कोणतेही सरकार आले तरीही पूर्ण आर्थिक वर्षात या योजनेचा लाभ मिळेल.ज्या महिलांनी उशीरा अर्ज केले असतील त्यांनाही योजनेचा लाभ जुलै महिन्यापासूनच मिळणार आहे.तरी जिल्ह्यातील सर्व महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा; असे आवाहन डॉ.होळी यांनी केले.या योजनेत महाराष्ट्रातील सर्वात चांगले काम गडचिरोली जिल्ह्यात झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाचे कौतुक केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
शासनाद्वारे महिलांच्या सन्मानार्थ विविध कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यात महिलांना आर्थिंक स्वावलंबन देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’,रोजगार देणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’,शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’, वर्षातून तीन सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’,मुलींना मोफत उच्च तंत्र शिक्षण देण्याचा शासन निर्णय,ज्येष्ठ नागरिकांसाठीची ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ आणि ‘वयोश्री योजना’, कामगार कल्याण योजना यासह राज्य व केंद्र शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेण्याचे आणि यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक व तलाठी यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे डॉ.होळी यांनी सांगितले.
योगीता पीपरे,राजेंद्र भुयार यांनीही यावेही मनोगत व्यक्त केले.अर्चना इंगोले यांनी प्रास्ताविक केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ३१ जुलै पर्यंत १ लाख ५६ हजार ३७९ महिलांनी अर्ज केले होते.त्यापैकी १ लाख ५३ हजार ३४८ महिलांचे अर्ज मंजूर करून निधी मिळण्याकरिता शासनाकडे पाठविण्यात आले होते. यापैकी १ लाख ३३ हजार महिलांच्या खात्यात माहे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे प्रत्येक १५०० प्रमाणे एकूण ३ हजार रूपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे.उर्वरित २० हजार महिला त्यांचे बँक खाते जसे-जसे आधार जोडणी पूर्ण करतील तसे-तसे त्यांच्या खात्यात रकम जमा होत जाईल.तसेच १ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान ४२ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १० हजार अर्ज मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आले आहे.अर्ज स्विकारण्याची आणि तपासणी करून मंजूर करण्याची कार्यवाही निरंतर सुरूच आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत लाभ वितरणाचा राज्याचा मुख्य सोहळा पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नियोजन भवन येथे करण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरूपात धनादेशचे वाटप करण्यात आले.
उपस्थितांचे आभार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला,महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेतीची वाहतूक; दोन हायवा ट्रक जप्त..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत हायवा चालक सुमित संतोष टेंभूर्णे वय...

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

कुष्ठांतेयांची तालुका स्तरावर ११ सदस्यीय कार्यकारिणी गठित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,भिसी येथे सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या माध्यमातून २८ सप्टेंबर रोजी कुष्ठांतेयांची सभा आयोजित करण्यात आली.वैद्यकीय अधिकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!