Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील चालू वर्षातील खरीप हंगाम पैसेवारी जाहीर..

गडचिरोली जिल्ह्यातील चालू वर्षातील खरीप हंगाम पैसेवारी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील सन २०२५-२६ या  वर्षातील खरीप हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली असून जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ०.७२ इतकी निश्चित करण्यात आली आहे. तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाने ही संकलित पैसेवारी जाहीर केली असल्याची माहिती गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे असून त्यापैकी १ हजार ५५८ गावे खरीप पिकाखाली आहेत.याशिवाय, रब्बी पिकासाठी पात्र आणि खरीप पिकाच्या दोन-तृतीयांश क्षेत्राखाली येणारी ४ गावे या वर्गात गणल्या गेली आहेत.खरीप पिकाखाली असलेल्या गावांपैकी ५८ गावांत यावर्षी पिके झालेली नाहीत.खरीप पिकाखालील १ हजार ५०४ गावांमध्ये पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे नोंदले गेले असून ५० पैशांखाली पैसेवारी असलेले कोणतेही गाव नाही.विशेष म्हणजे,पैसेवारी ५० पैशांखाली असल्यास टंचाईसदृश्य परिस्थिती घोषित केली जाते.त्यानुसार लोकांना रोजगार पुरवावा लागतो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!