Thursday, October 8, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुक्या व ओल्या चाऱ्याची वाहतूक आणि विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
सन २०२६ च्या खरीप हंगामात ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व चामोर्शी या दोन तालुक्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा पशुधनासाठी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील चारा विक्रीसाठी इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाठविला जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका उद्भवू शकतो.त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्ह्याच्या महसुली हद्दीत हा आदेश लागू केला आहे.
आदेशानुसार,गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात अथवा राज्याबाहेर हिरवा चारा, कडबा,कोणत्याही प्रकारची कुट्टी,पेंढा,टीएमआर तसेच इतर पशुखाद्याची वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई आहे.ही बंदी सर्व प्रकारच्या सुक्या व ओल्या चाऱ्याला लागू राहील.
तथापि,शासकीय योजनांतर्गत होणारी चारा वाहतूक तसेच पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेली चारा वाहतूक या बंदीतून वगळण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता,२०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.सदर आदेश पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत अंमलात राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर...

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

ज्या लोकप्रतिनिधींच्या हातात राजकारणाची दोरी; तेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदानापासून राहणार दूर.. – १४ आमदार आणि दोन खासदार यांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.उद्या,शुक्रवार ९ ऑक्टोंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून २३ ऑक्टोंबर...

रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान; शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वाढविणे आणि सुधारित व संकरित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा वापर वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!