Monday, August 24, 2026
Homeगडचिरोली'कृषी पायाभूत सुविधा निधी' योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज...

‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत.. – शेतकरी,एफपीओ,सहकारी संस्था व कृषी उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शेतमालाचे मूल्यवर्धन,सुरक्षित साठवणूक, प्रक्रिया उद्योग आणि आधुनिक विपणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ योजनेअंतर्गत आकर्षक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपन्या(एफपीओ),सहकारी संस्था तसेच कृषी उद्योजकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी तातडीने ऑनलाइन अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात १९ जून ते २० जुलै या कालावधीत या योजनेची विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे.पीक काढणीनंतर आवश्यक असलेल्या कृषी पायाभूत सुविधांची उभारणी तसेच सामुदायिक शेतीसाठी आवश्यक आधुनिक सुविधा निर्माण करण्यास या योजनेद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे.त्यामुळे कृषी उत्पादनांची गुणवत्ता वाढण्याबरोबरच साठवणूक क्षमता,प्रक्रिया सुविधा आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
योजनेअंतर्गत मंजूर होणाऱ्या दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत देण्यात येते.तसेच या कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी(पतहमी)सुविधाही उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होते.
या योजनेत गोदामे,शीतगृहे(कोल्ड स्टोरेज),पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट,प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स सुविधा,सायलो,रिपनिंग चेंबर,ई-मार्केट सुविधा,जैविक इनपुट उत्पादन युनिट तसेच कस्टम हायरिंग सेंटर(सीएचसी)यांसारख्या विविध कृषी पायाभूत प्रकल्पांना आर्थिक सहाय्य दिले जाते. विशेष मोहिमेदरम्यान जनजागृती कार्यक्रम,शेतकरी मेळावे, कार्यशाळा,बँक समन्वय बैठका आणि लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात भात,नाचणी,तूर,हळद,शिंगाडा, हरभरा,मका,भाजीपाला तसेच इतर नाशवंत कृषी उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.या पार्श्वभूमीवर शीतसाखळी,पॅक हाऊस आणि आधुनिक कृषी प्रक्रिया सुविधांची उभारणी करण्यासाठी ही योजना विशेष उपयुक्त ठरणार असून,शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळवून देण्यास आणि कृषी क्षेत्रात मूल्यवर्धनाला चालना देण्यास मदत होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!