Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीकृत्रिम वाळू उद्योग सुरू करायचाय तर करा अर्ज..

कृत्रिम वाळू उद्योग सुरू करायचाय तर करा अर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात अलीकडील काळात नागरीकरणासोबतच पायाभूत सुविधांमध्ये होणारी वाढ तसेच प्रधानमंत्री आवास योजना,स्मार्ट गाव मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,सिंचन प्रकल्प आदी योजनांमुळे बांधकाम क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे नदीपात्रातील दर्जेदार वाळूची मागणी वाढली आहे.मात्र,नद्यांच्या पर्यावरणीय समतोलाच्या दृष्टीने नागरिकांनी व बांधकाम क्षेत्राशी निगडीत व्यावसायिकांनी नैसर्गिक वाळूचा पर्याय म्हणून स्वस्तात उपलब्ध होत असलेल्या एम-सॅन्डचा (कृत्रिम वाळू) जास्तीत जास्त वापर करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
महसूल विभागाच्या २३ मे २०२५ चा शासन निर्णय व १७ जुलै २०२५ चे परिपत्रकानुसार कृत्रिम वाळू धोरण निश्चित करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धतीही स्पष्ट करण्यात आली आहे.
एम-सॅन्डची वैशिष्ट्ये👇
 
एम-सॅन्डचे कण नैसर्गिक वाळूपेक्षा अधिक कोनीय व खडबडीत असल्याने ते सिमेंटसोबत उत्तम मिसळतात.त्यात गाळ व सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी असल्याने काँक्रीटची गुणवत्ता सुधारते व टिकाऊपणा वाढतो.नियंत्रित परिस्थितीत तयार होत असल्याने कणाचा आकार एकसारखा राहतो व काम सुलभ होते.काँक्रीटमध्ये पाणी व सिमेंटचा वापर कमी होतो, आर्थिक बचत होते व मजबुती वाढते.तसेच एम-सॅन्ड नदीच्या वाळूपेक्षा स्वस्त असून सहज उपलब्ध होऊ शकते.
अर्ज प्रक्रिया👇
एम-सॅन्ड उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली तसेच सर्व तहसिल कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करावा. याशिवाय शासनाच्या www.mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Application > M-sand Concession application > Application for private land (New quarry) / Application for private land (Ongoing quarry) या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.
अर्ज सादर करतांना अडचणी आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखेशी संपर्क साधावा. तसेच www.gadchiroli.nic.in या जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावरही सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!