Wednesday, September 30, 2026
Homeगडचिरोलीकुरखेडा येथील ठाणेदारांची सहा महिन्यांतच बदली…

कुरखेडा येथील ठाणेदारांची सहा महिन्यांतच बदली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-कुरखेडा तालुक्याच्या ठाणेदार पदी रेवचंद सिंगनजुडे यांची गेल्या सहा महिन्यांपासून वर्णी लागली होती.मागील पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच ते कुरखेडा येथे रुजू झाले होते. अशातच अवघ्या सहा महिन्यांतच बदली झाल्याने कुरखेडा शहरात चर्चांना उधाण येऊ लागले आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे जोर धरू लागले आहेत. देशी,विदेशी,थंडी बियर तसेच गावठी दारूची ‘विक्री जोमात अन् पोलीस प्रशासन कोमात’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.खुलेआम राजरोसपणे अवैध दारूचे धंदे सुरू असूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.काहींचे घर जणूकाही परवानाधारक ‘बार’ च असल्याचे दिसून येते.तळीरामांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालली आहे.यावर अंकुश घालणार कोण? कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर टांगला जातो आहे.अशातच कुरखेडा येथील सिंगनजुडे यांची गडचिरोलीच्या पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.गडचिरोली शहर व तालुक्याच्या कायदा सुव्यवस्थेची धुरा आता रेवचंद सिंगनजुडे यांना सांभाळावी लागणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून बस प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाने 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्य केले आहे.प्रवाशांना नानाविध सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य मार्ग...

अवैध रेतीची वाहतूक; दोन हायवा ट्रक जप्त..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत हायवा चालक सुमित संतोष टेंभूर्णे वय...

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!