Saturday, October 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकाम नाही तर दाम नाही' अंगणवाडी सेविकां बाबत निर्णय…संपाचा फटका

काम नाही तर दाम नाही’ अंगणवाडी सेविकां बाबत निर्णय…संपाचा फटका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बेमुदत संपाचे हत्यार उचलले आहे. गेल्या २४ दिवसांपासून सुरु असललेल्या या संपामध्ये अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही. संपाचा फटका अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना बसला असून राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने ‘नो वर्क नो पे’ या अनुषंगाने मानधन थांबविण्याचे आणि पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना दिले आहेत.जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद करुन सर्व अंगणवाडी सेविका- मदतनीस यांनी प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी 4 डिसेंबरपासून संप पुकारला आहे. या संपाचा फटका लाखो बालकांना बसत असून अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षापर्यंतची तब्बल तीन लाख बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. सोबतच गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मुलन आदी कार्यक्रमांवरही मोठा परिणाम झाला आहे.तोडगा निघत नसल्याने महिला व बालकल्याण विभागाने थेट पत्र काढत बालकांना नियमित पोषण आहार मिळावा; यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे आदेश दिले आहेत.यात गावातील महिला बचत गट,स्वंयसेवक,ग्रामसेवक, शिक्षक,मुख्याध्यापक यांच्या मदतीने पोषण आहाराचे वाटप करावे; असे सांगितले आहे.तात्पुरत्या स्वरूपात सेविकांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत काम सुरू ठेवावे तसेच संप काळात मानधनासाठी हजेरी भरण्यात येऊ नये; अशा सूचना केल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!