Tuesday, August 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तएसीचा स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू..!

एसीचा स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राजधानीत आज,रविवार ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास एका निवासी इमारतीत भीषण आगीची घटना उघडकीस आली असून भीषण आगीत तब्बल ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सदरची आग ही घरातील एसीच्या(एअर कंडिशनर) स्फोटामुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.पहाटेच्या सुमारास संपूर्ण परिसर गाढ झोपेत असतांनाच आज पहाटे ३ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास देशाची राजधानी दिल्लीच्या शाहदरा येथील विवेक विहार परिसरात बी-१३ क्रमांकाच्या इमारतीत अचानकपणे आगीचा भडका उडाला.भडका उडताच इमारतीतील नागरिक सैरभैर झाले.त्याच वेळेस काहींनी अग्निशमन दलास माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.आगीची सुरुवात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर झाली आणि काही वेळातच ज्वाळांनी संपूर्ण इमारतीला आपल्या विळख्यात घेतले.सुमारे अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.मात्र,तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे मोठे नुकसान झाले.या दुर्घटनेत आतापर्यंत ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पाच ते सहा जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.घडलेल्या भीषण दुर्घटनेमागे एअर कंडिशनरमध्ये (एसी)झालेला स्फोट कारणीभूत असल्याची शक्यता  वर्तवली जात आहे.सदरची चार मजली इमारत असून यामध्ये एकूण आठ फ्लॅट्स होते. आग लागली तेव्हा बहुतांश लोक गाढ झोपेत असल्याने त्यांना बाहेर निघण्याची संधीच मिळाली नाही.दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाने संयुक्त मोहीम राबवून सुमारे १० ते १५ लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.सध्या इमारतीतील आग पूर्णपणे विझवण्यात आली असून ‘कूलिंग ऑपरेशन’ सुरू आहे.अश्यातच आग लागण्यामागचे नेमके कारण काय?याचा कसून तपास सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!