- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिना निमित्य १५ ऑगस्ट २०२४ ला विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचे सत्कार जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे करण्यात आले.दरम्यान,गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा प्रशासन व गोंडवाना विद्यापीठातर्फे सुरु असलेल्या एकल, लोकसहभागातुन ग्रामसभा सक्षमिकरण कार्यक्रम अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसभा,सहयोगी मित्र,केंद्र समन्वयक,मार्गदर्शक यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.या सत्कार सोहळया प्रसंगी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय दैन, पोलिस अधीक्षक नीलोत्पल,गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी, या सर्वांच्या उपस्थित हा सत्कार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पार पडला.
संपूर्ण भारतात सर्वप्रथम सामूहिक वनहक्क प्राप्त करणारा जिल्हा म्हणून तथा सर्वाधिक वनव्याप्त जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्यता अधिनियम २००६ नियम २००८ सुधारित नियम २०१२ अंतर्गत जिल्ह्यात एकूण ११०९ ग्रामसभांना सामूहिक वनहक्क दावे प्राप्त आहेत.सदर कायद्याच्या अनुषंगाने सामूहिक वनहक्क क्षेत्राचे कामकाज पाहण्याकरिता सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. एकल लोकसहभागातून ग्रामसभा सक्षमिकरण उपक्रमाच्या मार्गदर्शनातुन या समिती अंतर्गत ग्रामसभांना सामूहिक वनहक्क क्षेत्रात जंगल संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून, ग्रामसभा,मानव विकास अंतर्गत गोडाऊन बांधकाम, नरेगा ऐंजीस (ऑनलाईन नरेगा पोर्टलवर नोंदणी) माध्यमातून सामूहिक वनहक्क क्षेत्रात घेण्यात येणारी कामे अशी विविध प्रकारची कामे करीत आहेत. मानव विकास मिशन कार्यक्रम २०२२-२३ अंतर्गंत ग्रामसभांना गोडाऊन बांधकाम करणे या योजनेतंर्गंत खेळते भांडवल प्रति ग्रामसभा ९ लक्ष रुपये अशा १३ ग्रामसभांना १.१७ (अक्षरी एक कोटी सतरा लक्ष रुपये फक्त) चे सामुहिक धनादेश या कार्यक्रमाप्रसंगी वितरित करण्यात आले.ग्रामसभांच्या सर्व कार्याची दखल घेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहयोगी मित्र, ग्रामसभा व मार्गदर्शकांचे जिल्हा प्रशासन गडचिरोली व गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी व उपस्थित पाहुने मंडळींतर्फे सत्कार करण्यात आले.संजय दैने जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी उत्कृष्ट कार्य केलेल्या ग्रामसभांचे व सहयोगी मित्रांचे अभिनंदन केले व पुढील उत्कृष्ट कार्यकरण्यास शुभेच्छा दिल्या.ग्रामसभांच्या उत्कृष्ट कार्याच्या गुणगौरव कार्यक्रमाप्रंसगी एकलचे नोडल अधिकारी चेतना लाटकर,कृषि तज्ञ मंगेश भानारकर,एकल कार्यक्रमाचे समन्वयक नरेश मडावी,सह समन्वयक नंदकिशोर मने तथा एकल सेंटर समन्वयक चंद्रकांत किचक,सुरज चौधरी व निलेश देसाई आदी उपस्थित होते.
- Advertisement -

