- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल उद्या, गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील महत्त्वाच्या विभागांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. उद्या,५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘कोया कृषी कुंभ २०२६’ या कार्यक्रमास सोनापूर येथील कृषी महाविद्यालय प्रांगणात उपस्थिती दर्शवून उद्घाटन व दुपारी १ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दिव्यांग प्रमाणपत्र एकत्रित वितरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर,दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात गडचिरोली जिल्ह्यातील ‘पाणंद रस्ते’ संदर्भातील आढावा बैठक.दुपारी ३.३० वाजता जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था व पणन महासंघ विभागाची आढावा बैठक.संध्याकाळी ४ वाजता गडचिरोली नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांची भेट आणि नगर परिषदेच्या कामाची आढावा बैठक, त्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रामटेककडे प्रयाण.
- Advertisement -

