Friday, August 28, 2026
Homeगडचिरोलीउद्याला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया..

उद्याला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक- २०२६ अंतर्गत जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया उद्या,रविवार २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार आहे.या निवडणुकीसाठी गडचिरोली येथे मतदान केंद्र क्रमांक १/१ निश्चित करण्यात आले असून, ते जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र,जुने शल्य चिकित्सक कक्षाजवळ, तळमजला,कॉम्पलेक्स,जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे असणार आहे.
या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या पात्र मतदारांनी मतदानासाठी येतांना ओळख पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. मतदारांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे ओळखपत्र, नोंदणी प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व पात्र मतदारांना आवाहन केले आहे की,लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर उपस्थित राहावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

किरण चौधरी “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कारा”ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दैनिक देशोन्नती "मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार" व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोलीतील किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’...

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!