Sunday, May 10, 2026
Homeगडचिरोलीउद्याला गडचिरोली येथे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री शिकावू उमेदवारी मेळावा व रोजगार मेळाव्याचे...

उद्याला गडचिरोली येथे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री शिकावू उमेदवारी मेळावा व रोजगार मेळाव्याचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गडचिरोली येथे उद्या,सोमवार ११ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता “PM-NAM प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळावा”तसेच रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.सदर मेळावा सर्व व्यवसायाच्या आजी व माजी आयटीआय पास व शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता असून नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी येणार आहे.
PM-NAM प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी योजना ही केंद्र शासन पुरस्कृत असून कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या मार्फत राबविण्यांत येत असून या व्दारे औद्योगिक आस्थापनेत आपले कौशल्य विकसित करुन आत्मनिर्भर होण्याची व रोजगाराची संधी उपलब्ध होते.सदर योजनेमुळे प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराचे धडे मिळतात.प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी तसेच रोजगार मेळावा अंतर्गत विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून सदर संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य  चौधरी व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार राजूरकर यांनी केले आहे.
शिकाऊ उमेदवारी करिता निवड करण्यात आलेल्या उमेदवार यांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे सोयी सुविधा उपलब्ध राहतील.
सदर मेळाव्याचे आयोजन “क्रांतिवीर  बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली” तसेच बीटीआरआय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित होत असुन याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.तसेच अधिक माहिती साठी-
मनिष  वाळके- ९४२२१८८००,औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली व एन.डी.मेश्राम-७९७२७६७४९२
 गटनिदेशक औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली
 मनिष उंबरकर- ९८९०५००३३६  बीटीआरआय, व्दारा आयटीआय,चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीची हत्या करणाऱ्या धनपाल रामटेकेला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालून, संतापाच्या भरात चाकूने वार करून,पत्नीची हत्या करणाऱ्या धनपाल रामटेकेला न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.चंद्रपूर...

वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जंगल परिसरात तेंदूपाने संकलन करीत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना काल शनिवारी गोंदिया...

तरुणाची हत्या; चार अल्पवयीन मुले अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शहराच्या पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जलाराम चौक परिसरात काल शुक्रवारच्या मध्यरात्री घडलेल्या हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ माजली.कार्तिक विलास भंडारी...

रेती माफियांच्या सराईत टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रशासनाने मनात आणले तर गौण खनिजांचा एक टोपलाही कुणी नेऊ शकणार नाही.पण,कोण अंगाला हळद लावून घेणार? असा प्रकार हल्ली सर्वत्र उघडकीस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!