Thursday, May 28, 2026
Homeगडचिरोलीउद्याला गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत.. - पहा कसे...

उद्याला गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत.. – पहा कसे असणार आरक्षण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी उद्या,शुक्रवार १० ऑक्टोंबर रोजी दुपारी १२.३० वाजता सोडत काढण्यात येणार आहे.सदरची सोडत जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन समितीचे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या १७ सप्टेंबर २०२५ च्या पत्रानुसार,गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या आरक्षणाची माहिती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे:
  • अनुसूचित क्षेत्रात न मोडणाऱ्या ५ पंचायत समित्या👇
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज,आरमोरी, गडचिरोली,चामोर्शी आणि मुलचेरा या ५ पंचायत समित्या संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या नाहीत.
या ५ सभापती पदांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण असेल:
अनुसूचित जाती (महिला): १ पद
अनुसूचित जमाती (महिला): १ पद
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग: २ पदे
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(महिला): १ पद
  • संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रामधील ७ पंचायत समित्या👇
कोरची,कुरखेडा,धानोरा,एटापल्ली,भामरागड,अहेरी आणि सिरोंचा या ७ पंचायत समित्या संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रामधील असल्यामुळे,या सभापती पदांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण असेल:
अनुसूचित जमाती: ३ पदे
अनुसूचित जमाती (महिला): ४ पदे
या सोडतीमध्ये अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,सर्वसाधारण तसेच यांतर्गत महिलांकरिता आरक्षण निश्चित करण्यात येईल.
ज्या नागरिकांना या सभेला उपस्थित राहण्याची इच्छा आहे,त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन समितीचे सभागृहात उपरोक्त ठिकाणी व वेळी उपस्थित राहावे,असे उपजिल्हाधिकारी (सामान्य)स्मिता बेलपत्रे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!