Sunday, July 26, 2026
Homeगडचिरोलीउद्याला गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांची आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून विशेष मुलाखत...

उद्याला गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांची आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून विशेष मुलाखत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम क्षेत्रात मोडत असल्याने शांततामय वातावरणात निवडणूका घेणे हे प्रशासनापुढे मोठे आव्हान असते. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिस प्रशासनाने काय तयारी केली आहे,याबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांची विशेष मुलाखत उद्या १४ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. ‘दिलखुलास’ या कार्यक्रमाचे आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत प्रसारण होणार आहे.याबाबत जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
निवडणूक आचार संहिता काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची भुमीका,प्रचार सभा,रॅली यासाठीची खबरदारी,मतदान केंद्रावरील उपाययोजना,निवडणूक साहित्य आणि मतदान अधिकारी यांना सुरक्षीतपणे संवेदनशील मतदान केंद्रावर पोहचवणे आणि परत आणण्यासाठीच्या उपाययोजना,संभाव्य धोक्यांना प्रतिबंध करण्यासाठी आखलेली धोरणे,शांततापूर्ण निवडणुकांना प्रोत्साहन देण्यासाठी पोलिस विभागाचे नियोजन याबाबत निलोत्पल यांनी मुलाखतीत ‘दिलखुलास’ माहिती दिली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!