Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीआरमोरी,गडचिरोली व अहेरी विधानसभा मतदारसंघाकरिता ४८५५ मतदान अधिकाऱ्यांची निवड..

आरमोरी,गडचिरोली व अहेरी विधानसभा मतदारसंघाकरिता ४८५५ मतदान अधिकाऱ्यांची निवड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी निवडणुकांच्या तयारी लागले आहेत.येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.अशातच आज शनिवारी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रथम सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पार पडली.गडचिरोली जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने,नोडल अधिकारी शेखर शेलार,जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी संजय त्रिपाठी तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
मतदान केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी क्रमांक १ व इतर मतदान अधिकारी यांची सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली.यात जिल्ह्यातील आरमोरी,गडचिरोली व अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण ४८५५ मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यात आरमोरी क्षेत्राकरिता १५४६ अधिकारी,गडचिरोली क्षेत्राकरिता १८२१ तर अहेरी विधानसभा क्षेत्राकरिता १४८८  मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात २७ महिला अधिकारी तर ६१ दिव्यांग मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!