Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोलीआमरण उपोषण कर्त्याच्या जीवावर उठलाय अधिकारी…एक दिवस निघणार साहेबगीरी….'अरे तु साहेब नाहीस'…....

आमरण उपोषण कर्त्याच्या जीवावर उठलाय अधिकारी…एक दिवस निघणार साहेबगीरी….’अरे तु साहेब नाहीस’…. ‘तु तर लोकसेवक’…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- गेली दहा दिवसांपासून देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत पूर्वी झालेल्या व हल्ली सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या रोपवन साईटवर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी सत्यवान रामटेके गडचिरोली मुख्य वनसंरक्षक (प्रादे.)वनवृत्त कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.मात्र त्यांच्या आमरण उपोषणाची दखल अजून पावेतो घेण्यात आली नसल्याने आमरण उपोषण कर्त्याच्या जीवावर  अधिकारी उठलाय की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.अशातच एक दिवस साहेबगिरी निघणार असल्याचे सर्वत्र सुरू निघू लागले आहेत.

कुठल्याही कार्यालयातील कितीही मोठा अधिकारी वा कर्मचारी तरीही असा व्यक्ती साहेब नसतो.मात्र हल्ली नुकताच काही महिन्यांपूर्वी आलेला अधिकारी स्वतःला मोठा साहेब समजून तोऱ्यात वावरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.आता त्याला कोण सांगणार की ‘अरे तु साहेब नाहीस’…. ‘तु तर लोकसेवक’..आहेस व जिथ पर्यंत आहेस तिथ पर्यंत लोक सेवकच राहणार आहेस.कार्यकाळ संपला की कुणीही ढुंकून पाहणार नाही.सुरुवातीला हे साहेबगिरी दाखवीत नाहीत.सुरळीतरित्या कामे पार पाडण्यात मग्न असतात.मात्र जस-जशी यांना पैश्याची चटक लागत जाते तस-तशे हे साहेबगीरी दाखवू लागतात. व तोऱ्यात वावरू लागतात.यांना सर्वसामान्य नागरिकांशी कसलेही देणे-घेणे नसते.फक्त मिळकत कुठून येणार याची नेहमीच वाट बघत असतात. गैरव्यवहार व भ्रष्टाचार करण्यात रमून जातात.एखादे प्रकरण उघडकीस येताच ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावून हात वर करीत असतात.खाऊनही न खाल्ल्याचे भासवित असतात.वरून दिमाखदार गोष्टी करून उडवा-उडविची उत्तरे देऊन ‘सुमळी मध्ये कोंबडी’ खात असल्याने यांची साहेबगीरी एक दिवस निघणारच; त्यामुळे ‘जरा सांभाळून पुढचे पाऊल जरा जपून’ असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!