Friday, September 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता सर्व शाळांमध्ये गुंजनार 'वंदे मातरम्'..

आता सर्व शाळांमध्ये गुंजनार ‘वंदे मातरम्’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सुरुवातीला महाराष्ट्र राज्याच्या शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ चे पहिले दोन श्लोक गायले जायचे.मात्र,आता राज्यातील सर्व शाळांना ‘वंदे मातरम’ पूर्ण स्वरूपात गाणे बंधनकारक करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकारने घेतला आहे. दिवंगत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ या गाण्याच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आदेश जारी करण्यात आला आहे.आज,शुक्रवार ३१ ऑक्टोंबर २०२५ रोजी या गाण्याच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण होत आहेत.या प्रसंगी,सर्व शाळा संपूर्ण वंदे मातरम् गीत गातील. यासोबतच,शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’च्या इतिहासावर आधारित प्रदर्शने आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत; जेणेकरून विद्यार्थ्यांना या राष्ट्रगीताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व याबद्दल माहिती मिळू शकेल.३१ ऑक्टोंबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येईल,असेही सरकारने स्पष्ट केले आहे.या काळात ‘वंदे मातरम्’ हे संपूर्ण गीत गायले जाईल आणि एक प्रदर्शन आयोजित केले जाईल. सरकारने या निर्णयाबाबतच्या संदर्भ पत्राची प्रत शिक्षण विभागालाही पाठवली आहे.त्याचबरोबर,सर्व शैक्षणिक संस्थांना या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!