Tuesday, August 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शेतीसंबंधित कामांसाठी रेती,मुरूम,दगड आणि मातीसाठी नसणार रॉयल्टीची गरज.. - अधिवेशनात मोठी...

आता शेतीसंबंधित कामांसाठी रेती,मुरूम,दगड आणि मातीसाठी नसणार रॉयल्टीची गरज.. – अधिवेशनात मोठी घोषणा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली सर्वत्र गौण खनिजांची चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे.पण,एखाद्या शेतकऱ्यास शेतातील रस्ते दुरुस्ती आणि शेतीसंबंधित कामांसाठी गौण खनिजांची आवश्यकता भासत असेल तर आता कुठलेही शुल्क भरण्याची गरज नसणार आहे.यासंबंधात आज,गुरुवार २ जुलै रोजी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतीसंबंधित कामांसाठी लागणारे गौणखनिज जसे की,रेती,मुरूम,दगड व माती इत्यादी आता पूर्णपणे ‘रॉयल्टीमुक्त’ म्हणजेच वाहतूक करण्यासाठी कुठल्याही परवान्याची गरज भासणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे.मात्र,सदरची सुट ही केवळ शेतातील शेत रस्ते दुरुस्ती आणि शेतीच्या आवश्यक कामांसाठीच लागू राहणार आहे.याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल.अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना या कामासाठी पंधरा दिवसांची अधिकृत परवानगी दिली जाईल.शेतीच्या कामासाठी आणि गौणखनिजाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई केली जाणार नाही,असेही महसूलमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले.याबद्दल काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनीही या निर्णयाचे स्वागत करत,या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक भार हलका होईल, अशी प्रतिक्रिया दिली.त्याचबरोबर शेतीसाठी लागणारे गौणखनिज रॉयल्टीमुक्त(अधिकार शुल्क वगळून) उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयाचे विधानसभेत सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदार स्वागत केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग...

आता गडचिरोलीत होणार विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्यकास्तकार,आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने गडचिरोली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!