Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शासकीय धान खरेदी केंद्रावरील भोंगळ कारभार बंद; धान विक्रीची होणार पडताळणी..!

आता शासकीय धान खरेदी केंद्रावरील भोंगळ कारभार बंद; धान विक्रीची होणार पडताळणी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये,यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करते.शेतकऱ्यांना शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या बीम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी लागते.ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडूनच धान खरेदी केली जाते. पण,मागील काही कालावधीत बोगस शेतकरी तसेच शेतकऱ्यांच्या नावावर ऑनलाइन नोंदणी करून काही व्यापाऱ्यांनी धानाची विक्री केल्याचे प्रकार उघडकीस आले.त्यामुळे या प्रकाराला पूर्णपणे आळा घालण्यासाठी शासनाने २०२५-२६ म्हणजेच यावर्षीपासून नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा अंगठा थंब मशीनवर घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.या थंबवरील अंगठ्याची शेतकरी प्रत्यक्ष धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी गेल्यानंतर पडताळणी करूनच धान खरेदी केली जाणार असल्याची माहिती आहे.यासाठी सर्व शासकीय धान खरेदी केंद्रांना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून थंब मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.त्यातच,दरवर्षी दिवाळीपूर्वी शासकीय धान खरेदीला सुरुवात होते.पण,यंदा शासनाने धान खरेदीचे आदेश उशिराने काढले.शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावरून नोंदणी करता येणार आहे.तर येत्या १५ नोव्हेंबरपासून शासकीय धान खरेदीला सुरुवात होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!