Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता प्रवासी मजूर,विद्यार्थी व रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मिळणार ५ किलोचा सिलेंडर.....

आता प्रवासी मजूर,विद्यार्थी व रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मिळणार ५ किलोचा सिलेंडर.. -केवळ ओळख पत्रावर मिळणार सिलेंडर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-आखाती देशातील युद्धजण्य परिस्थिती,तणाव आणि इंधन पुरवठ्यावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता केंद्र सरकारने ५ किलो एफटीएल(फ्री ट्रेड एलपीजी)सिलिंडरसंदर्भात मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे.केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक महत्त्वपूर्ण पत्र पाठवून ५ किलो सिलिंडरचा पुरवठा आणि वितरणाला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.हे पाऊल प्रामुख्याने प्रवासी मजूर,विद्यार्थी,रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि ज्यांच्याकडे कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा नाही,अशा लोकांसाठी अत्यंत महत्वाचे ठरेल.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे,५ किलो सिलिंडरसाठी कोणत्याही रहिवासी पुराव्याची गरज भासणार नाही,तर केवळ वैध ओळखपत्र(आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र) दाखवून जवळच्या एलपीजी वितरकाकडून बाजार दराने(विनाअनुदानित)हे सिलिंडर घेता येईल. महत्वाचे म्हणजे,या वितरणात पारदर्शकता रहावी यासाठी राज्य सरकारांना काळाबाजार रोखण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.प्रवासी मजुरांसाठी उपलब्ध असलेल्या ५ किलो एफटीएल सिलिंडरचा दैनंदिन पुरवठा आता दुप्पट करण्यात आला आहे.ही वाढ २ आणि ३ मार्च २०२६ दरम्यान झालेल्या सरासरी पुरवठ्यावर आधारित आहे. महत्वाचे म्हणजे, ही वाढ २१ मार्च २०२६ च्या पत्रातील २० टक्के मर्यादेपेक्षा अधिक आहे.हे अतिरिक्त सिलिंडर पूर्णपणे राज्य सरकार आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकारात असतील.या सिलिंडरचा वापर केवळ संबंधित राज्यातील मजुरांसाठीच केला जाईल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!