उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली आधार कार्ड शिवाय कुठलेही काम होतच नाही.आधार कार्डला एवढे महत्व आले की, सर्व आर्थिक व्यवहारांपासून ते जन्म मृत्यूची नोंद व इतर ठिकाणीही आधार कार्ड मागितल्या जातो.एखादा हॉटेल तसेच खाजगी ठिकाणीही आधारकार्डच्या फोटो कॉपी मागून माहिती संग्रहित केली जाते.महत्वाचे म्हणजे, आधार कार्डवर फोटो,नाव,गाव व संपूर्ण पत्ता असल्याने याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही; यासाठी आधारकार्डला अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार आता नवीन आधार कार्ड जारी करण्याच्या विचाराधीन आहे.नवीन आधारकार्डवर फक्त तुमचा फोटो आणि एक क्यूआर कोड असेल.यामध्ये सध्या छापलेले नाव,पत्ता आणि आधार क्रमांक यांसारखे तपशील काढून टाकले जातील.भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण लोकांच्या माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि ऑफलाइन पडताळणीला प्रोत्साहन मिळू नये,यासाठी आधार कार्डधारकाच्या फोटोसह आणि क्यूआर कोडसह आधारकार्ड जारी करण्यावर विचार करत आहे. जेणेकरून लोकांच्या माहितीचा गैरवापर रोखता येईल. देशात आधारची पडताळणी आधार कार्ड धारकाच्या सहमतीशिवाय केली जाऊ शकत नाही.कोणतीही संस्था वा एखाद्या व्यक्तीने असे केल्यास तिच्यावर १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड लावला जाऊ शकतो.सहमती ही बायोमेट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच घेतली जाईल, जी कार्ड धारकाकडून ओटीपी,फिंगरप्रिंट,आयरिस इत्यादीद्वारे घेतली जाऊ शकते.फक्त यूआयडीआयद्वारे अधिकृत संस्था आणि बँकाच आधारची पडताळणी करू शकतात.
आता आधार कार्डमधील सर्व माहिती राहणार गोपनीय; आधार कार्डमध्ये होणार बदल..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

