Tuesday, April 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता..

आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा होणार? याकडे सर्वजण टक लावून पाहत आहेत.सर्वच पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून हौसे-गवसे आणि नवखे यावेळी आमदार बनू पाहत आहेत. अशातच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आज मंगळवार १५ ऑक्टोंबरला जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.मुख्य निवडणूक आयुक्त दिल्लीत त्यासाठी पत्र परिषद घेतील अशी खात्रीलायक माहिती आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू होईल.राज्य सरकारला कोणतेही निर्णय आचारसंहितेच्या काळात घेता येणार नाहीत.
यावेळी निवडणूक एका टप्प्यात होणार की दोन, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.२०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक आचारसंहिता ही २१ सप्टेंबर रोजी जाहीर झाली होती आणि २१ ऑक्टोंबरला मतदान झाले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रपरिषद आज मंगळवारी दुपारी मुंबईत होणार आहे.महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ते जाहीर करतील,अशी शक्यता आहे.तिन्ही पक्षांच्या एकत्रित निवडणूक रणनीतीबद्दल हे नेते काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!