Thursday, October 8, 2026
Homeगडचिरोलीअनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध बांधकामांच्या अंदाजपत्रकामध्ये जादाचे मुल्यांकन दाखवून शासकिय निधीचे नुकसान करणे व इतर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी निलेश पी.जवंजाळकर यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.या संदर्भात नुकतेच गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी आदेश जारी केला.निलेश जवंजाळकर यांचे निलंबन काळातील मुख्यालय पंचायत समिती,सिरोंचा येथे ठेवण्यात आले असून त्यांना कार्यालय प्रमुखाचे पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही,असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
गावाचे सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरून विविध विकास कामांकरीता ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो.मात्र,गावगाडा हाकणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांना प्राप्त निधी व त्यावरील खर्च निधी किती?याची माहिती नसल्याने अनेकांची फोडणी साधतांना दिसून येते.अश्याच प्रकारे पंचायत समिती कुरखेडा अंतर्गत ग्रामपंचायत पुराडा येथे निलेश पी.जवंजाळकर हे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असतांना जीइएम पोर्टल(Gem Portal)वर खरेदी न करणे,अर्थ संकल्पीय तरतूदी शिवाय व तरतूदीपेक्षा नियमबाह्य जादादर खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे व कायदेशीर विनियोग न दाखवणे,१४ व १५ वा वित्त आयोगाअंतर्गत विविध बांधकामांच्या अंदाजपत्रकामध्ये जादाचे मुल्यांकन दाखवून शासकिय निधीचे नुकसान करणे,१४ व १५ वा वीत्त आयोगाचे देयके प्रदान करण्यापूर्वी कार्यालयीन टिपणी-मसुदाचा वापर न करणे व इतर गैरवर्तणूकीच्या बाबी करीत असल्याने त्यांचेविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यास कुरखेडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रस्ताव सादर केला होता.या प्रकरणी निलेश जवंजाळकर यांनी नियत कर्तव्यात कसूर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा(वर्तणुक)नियम व १९६७ चे नियम ३ चा भंग केल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे पुराडा येथील दप्तराची सखोल तपासणी करण्याकरिता व त्यांनी तपासणीकामी अडथळा आणु नये म्हणुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा(शिस्त व अपील)नियम १९६४ मधील ३(१)(अ)नुसार जवंजाळकर यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान,महाराष्ट्र नागरी सेवा(निलंबन,बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने)नियम १९८१ चे नियम ६८ मधील तरतुदीनुसार निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहील.सदर भत्ता त्यांच्या सरासरी अर्धपगारी रजेबरोबर राहील व त्यावर अनुज्ञेय असलेला महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.निलंबन कालावधीत त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा(पदग्रहण अवधी स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने)नियम १९८१ चे नियम ६९ च्या पोटनियम ४ मधील तरतुदीनुसार कोणतीही खाजगी नौकरी तथा धंदा करता येणार नाही,तसे केल्यास ते शिक्षेस पात्र राहतील. तसेच प्रत्येक महिण्यात तसे प्रमाणपत्र प्रस्तुत केल्याशिवाय निलंबन भत्ता प्रदान केला जाणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ज्या लोकप्रतिनिधींच्या हातात राजकारणाची दोरी; तेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदानापासून राहणार दूर.. – १४ आमदार आणि दोन खासदार यांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.उद्या,शुक्रवार ९ ऑक्टोंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून २३ ऑक्टोंबर...

रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान; शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वाढविणे आणि सुधारित व संकरित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा वापर वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि...

सिने सृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन.. – ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’...

उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले.गोव्यातील डोना पौला येथील...

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!