Friday, August 28, 2026
Homeगडचिरोलीअखेर आनंदराव गेडाम व डॉ.शिलू चिमूरकर सहा वर्षांसाठी निलंबित... -पक्षाशी बंडखोरी करून...

अखेर आनंदराव गेडाम व डॉ.शिलू चिमूरकर सहा वर्षांसाठी निलंबित… -पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष मैदानात उतरणे भोवले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसमधील बंडखोर दोन उमेदवारांचे अखेर काँग्रेस पक्षाकडून रविवार दिनांक-१० नोव्हेंबरला सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.यात माजी आमदार आनंदराव गेडाम यांचेसह डॉ.शिलू चिमूरकर यांचा समावेश आहे.
आरमोरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाचे वतीने उमेदवारी मिळण्याकरिता इच्छुकांची संख्या भाऊगर्दी झाल्यासारखी होती. गर्दीमुळे खुर्ची एक व बसण्यासाठी उभे असणारे अनेक,असे झाल्याने पक्षापुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता.त्यानुसार जनतेचा कौल वा उमेदवारांची पार्श्वभूमी जाणून घेत जिल्ह्यातील विधानसभा उमेदवारीचे चित्र काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.अशातच ‘मैं बडा मैं बडा’ असे करीत अनेकांनी
पक्षादेश झुगारून अपक्ष नामांकन दाखल केलेत. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील आणखी दोन,यात गडचिरोली मतदासंघांतून डॉ.सोनल कोवे यांनी बंडखोरी करून अपक्ष मैदानात उतरल्या,तर भरत येरमे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली.असे आरमोरी विधानसभा मतदारसंघातून दोन तर गडचिरोली विधानसभा मतदारसंघांतून दोन असे चार जणांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!