Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीआचारसंहितेची धडकी; शासकीय विभाग जोरदारपणे लागले कामाला...

आचारसंहितेची धडकी; शासकीय विभाग जोरदारपणे लागले कामाला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अद्याप निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा केली नसली, तरी शासकीय विभाग जोरदारपणे कामाला लागले आहेत.ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होईल,असे अंदाज दर्शविण्यात आल्याने प्रशासकीय विभागात कामांची लगबग सुरू झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय,विभागीय आयुक्तांचे कार्यालय,पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालये यांना आचारसंहिताचे नियम लागू होतात.आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत आचारसंहितेचा कोणताही भंग होऊ नये; यासाठी या कायार्लयाला डोळ्यात तेल घालून कामे मार्गी लावावी लागतात.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सरकारच्या विविध विभागांच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागते.त्यानुसार विविध विभागांतील अधिकारी,कर्मचारी यांना सहभागी करून घेणे,त्यांना निवडणूक प्रक्रियेबाबतचे प्रशिक्षण देणे,त्यांना निवडणूक काम देणे याबाबत पुढील काळात निवडणूक आयोगाचे प्रशासन सक्रिय राहणार आहे. जिल्हा परिषदेतदेखील कामांनी गती घेतली आहे. प्रामुख्याने आमदारांच्याकडून मतदारसंघात कामे सुचविली जात आहेत.त्यासाठी विविध लेखाशीर्षकाखाली कामे सुचविण्यासाठी आमदारांकडून प्रशासनाला पत्र दिले जात आहे. आमदारांच्या स्वीय सहाय्यक यांच्याकडून दररोज नवीन पत्र दिले जात असून; कामे मंजूर करण्यासाठी मागणी केली जात आहे.त्यासाठी स्वीय सहाय्यक जिल्हा परिषदेत विविध विभागात पाठपुरावा करताना दिसत आहेत.आमदार,खासदारांकडून कामांसाठी दाखल होणारे पत्र थेट मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यक यांना दिली जात आहेत.नोव्हेंबर महिन्यात साधारणपणे दहा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबरदरम्यान निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत.त्यामुळे आचारसंहिता ही दहा ऑक्टोबरपर्यंत लागेल,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.कामे करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने आमदारांची धावपळ सुरू झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!