Sunday, October 25, 2026
Homeगोंदियानोकरीचे आमिष दाखवून ११ लाख ५० हजाराने फसवणूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून ११ लाख ५० हजाराने फसवणूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गोंदिया :-शिवनाथ गेडाम त्यांची पत्नी व एका नातेवाइकांना नोकरी लावून देतो म्हणून त्यांच्याकडून नोकरीच्या नावावर ११ लाख ५० हजार रुपये तिघांनी  घेतले.त्यांना खोटे मुलाखत पत्र देऊन त्यांची मुलाखतही घेण्यात आली.त्यांच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेऊन त्यांची फसवणूक केली.

वर्धाच्या ॲम्युनिषन डेपोत नोकरी लाऊन देण्याचे आमिष देऊन ११ लाख ५० हजारांची फसवणूक करणाऱ्या तिघांवर तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात तिरोडाच्या पारसनगरी येथील शिवनाथ प्रभुदास गेडाम (४३) यांनी पोलिसात तक्रार केली.

आरोपी महेश गायधने (३८, रा. नवेझरी), सचिन डोंगरे (३८, रा. तिरोडा) व बाबूलाल मडावी (४५, रा. देवरी) या तिघांनी ११ ऑक्टोबर २०१७ ते १३ नोव्हेंबर २०१७ या काळात नोकरी लाऊन देण्याच्या नावावर ११ लाख ५० हजार रुपये घेतले.परिणामी आपली फसवणूक झाल्या प्रकरणी शिवनाथ गेडाम यांनी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता तिरोडा पोलिसात तक्रार केली.तिरोडा पोलिसांनी तीन आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हनवते करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!